About Us

आर्थिक साक्षरता मीशन
आर्थिक साक्षरता मीशन हि एक चळवळ आहे, समाजातील लोकांच्या आर्थिक अडचणीना दूर करण्यासाठी त्यांना आर्थिक साक्षर करणे हाच एक उत्तम पर्याय आहे. समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी उद्योजक निर्मिती झाली पाहिजे व ती टिकली पाहिजे, परंतु आज बरेचसे उद्योजक उत्साहात नवीन व्यवसायाची सुरूवात करतात पण आर्थिक साक्षर नसल्याने पहिल्या १ -२ वर्षातच ते बंद करतात. यामुळे त्याचे नुकसान तर होतेच पण समाजाचे, देशाचे नुकसान सुद्धा होत आहे. आणि उद्योग व उद्योजक हा एकच घटक आहे जो या समाजाला श्रीमंत व समृद्ध बनवू शकतो म्हणूनच उध्योजकांना आथिर्क साक्षर करून समाज श्रीमंत व सम्रुद्ध बनविणे हे आमच्या असण्याचं कारण आहे.आसामी म्हणजेच आर्थिक साक्षरता मिशन या संस्थेच्या अंतर्गत आम्ही समाजात आर्थिक साक्षरतेचा प्रसार करून लोकांना श्रीमंत व समृद्ध करणे या ध्येयाने काम करत आहोत व हेच आमचे मिशन आहे. हे करत असताना आम्ही उद्योजकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देतो तसेच वेगवेगळ्या प्रकारचे सेमिनार्स घेतो.आज उद्योजक व्यवसाय करत असताना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करत आहेत जसे दैनंदिन वापरासाठी लागणारे खेळते भांडवल, उधार वसुली, स्पर्धा, योग्य नफा या सारख्या अनेक. या समस्यांचा सामना करताना उद्योजकांची बरीचशी शक्ती खर्च होत असते त्यामुळे व्यवसाय वाढीसाठी जोमाने काम करणे होत नाही.खरे तर या सगळ्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी धडपडण्यातच वेळ खर्च होतो व हे करत असताना घाई घाईने निर्णय घेतले जातात आणि या निर्णयाचे परिणाम कधी कधी मोठी अडचण निर्माण करून नुकसान करतात. खरेतर व्यवसाय म्हणजेच निर्णय घेण्याच्या क्षमतेतून नफा कमावणे, शेवटी जोखीम (रिस्क) घेण्याचा निर्णयच नफा कमावून देतो. त्यामुळेच आम्ही उद्योजकांचा नफा वाढविणे व त्याला त्याच्या निर्णयातून जास्तीत जास्त नफा / फायदा करून देऊन त्याला श्रीमंत करणे हा आमचा हेतू आहे . उद्योजकाचे निर्णय हे बरेचदा त्याला वाटते म्हणून घेतले जातात, एखाद्या विषयाचा कोणताही अभ्यास नसताना किंवा अर्धवट माहितीच्या आधारवर घेतले जातात. याला कारण कदाचित असे असेल कि अशी माहिती उद्योजकांना मिळतच नसेल किंवा ती यंत्रणाच त्यांच्याकडे अस्तित्वात नसेल म्हणून निर्णयाचे गंभीर परिणाम उद्योजकाला भोगावे लागतात. उद्योजकाला या त्रासातून वाचवण्यासाठी त्यांना त्यांच्या उद्योगातील आवश्यक ती माहिती मिळवण्याची यंत्रणा आम्ही देण्याचे ठरवले आहे. या यंत्रने अंतर्गत आम्ही विविध सेवा देतो ज्यात व्यवसायाचे वार्षिक नियोजन (Annual Business Plan Preparation) व त्याचे कालानुरूप विश्लेषण करणे (Business Financials Analysis System), आणि अकाउंटिंग (Accounting) या सेवा देतो

The Aarthik Saksharta Mission is a movement, the best way to solve the financial problems of the people in the society is to make them financially literate. Entrepreneurs should be created and sustained to uplift the economic status of the society, but today many entrepreneurs start new businesses with enthusiasm but due to lack of financial literacy, they close in the first 1-2 years. This not only harms him but also the society and the country. And industry and entrepreneurship is the only factor that can make this society rich and prosperous, so the reason we have is to make the society rich and prosperous by making the entrepreneurs financially literate.

Under the Assami Aarthik Saksharta Mission, we are working towards the goal of enriching and enriching the people by spreading financial literacy in the society and this is our mission. While doing this we provide different types of services for entrepreneurs as well as conduct different types of seminars. And Business Plan Workshop is one of the seminar which specially created for SME’s and MSME’s.


AASAMEE

Mission: 

“उद्योजकांना आर्थिक साक्षर करून समाजात श्रीमंती व समृद्धी वाढविणे.”

Vision:

1 कोटी उद्योजकांना आर्थिक साक्षर करणे 

 १००० उद्योगांसाठी इको सिस्टम तयार करणे 

 10 लाख अकाऊंटंटना ट्रैनिंग व रोजगार देणे

Courses

  • Morning Miracle
  • Business Plan Workshop
  • Miracle Life Program

Address

A101, SHASHI ANAND ENCLAVE, INDIRA NAGAR JOGGING TRACK, NASHIK

CONTACT: 9922591532


 

Disclaimer : We own all rights to the content. Creative Commons.

© Copyright 2018 Training Institute

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
AASAMEE 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy