"जीवनात जर काही आव्हाने असतील तर काही मनोरंजक, नाविन्यपूर्ण उपाय सापडतात. आव्हानांशिवाय जीवन रटाळ होते ज्यामध्ये तोचतोपणा असतो."
- श्री रतन एन टाटा
भारतातील सध्याचे वातावरण हे उद्योजकतेची अतिशय पोषक आहे, सारे जग आज भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणून बघत आहे. जागतिक पातळीवर भारताचा दर्जा खूप मोठ्या प्रमाणात उंचावला आहे. तसेच आत्ताचा तरुण उद्योजकही सकारात्मकतेने येणाऱ्या भविष्याकडे बघत आहे. परंतु या तरुणांना त्यांच्या उद्योजकीय प्रवासामध्ये बऱ्यचश्या समस्यांना व आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. हा लेख त्याबद्दलच थोडक्यात लिहिला आहे:
1. सरकारी प्रमाणपत्रे व रेजिस्ट्रेशन मधील अडथळे: उद्योजक अनेकदा जटिल नियम, परवाना आणि कम्प्लायन्सेसमधील समस्यांशी झुंजत आहेत. आज हि व्यवस्था नोकरशाहीच्या जाळ्यात अडकली आहे. नौकरदारांमध्ये कामाबद्दलची अनास्था व उद्योग आणि उद्योजकांबद्दल असणारी चुकीची समजूत यांनी ही पूर्ण व्यवस्था भ्रष्टाचाराच्या जाळ्यात सापडली आहे व याचा नवा उद्योजकांना खूप जास्त त्रास होतो आहे.
2. भांडवल (फंडिंग): भांडवल उभारणी हि खूप गंभीर समस्या प्रत्येक नवा उद्योजकाला येतेच. मुळात पैसे मागणे याकडे नकारात्मक दृष्टीकोनातून बघितल्यामुळे इतरांच्या पैशावर व्यवसाय उभा करायचा विश्वास आणि प्रयत्न दोन्ही होत नाही. आणि एखादे फंडिंग मिळालेच तर ते कसे वापरावे याचे ज्ञान नाही. म्हणून उद्योजकाला भांडवला संबंधातील खुपश्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
3. बाजारातील स्पर्धा: भारताची बाजारपेठ मोठी असली तरी अत्यंत स्पर्धात्मक आहे, ज्याला या स्पर्ध्येशी दोन हात करायचे आहेत त्याने नाविन्यपूर्ण धोरणांचा स्वीकार केला पाहिजे. अन्यथा या स्पर्धात्मक जगात टिकणे मुश्किल होईल. आज भारत जगासाठी एक संधी आहे आणि म्हणून जगभरातून इथे येणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे व वाढत राहणार आहे. त्यामुळे उद्योजकांनी स्वतःला यासाठी तयार करणे आवश्यक आहे.
4. पायाभूत सुविधां: भारताने मागील काही वर्षात खूप प्रगती केली आहे. मेक इन इंडिया, मेड इन इंडिया सारख्या योजनांनी खूप चांगले काम केले आहे. परंतु आजही गावोगावी उद्योग वाढीसाठी लॉजिस्टिकची सुविधा अजून विकसित करणे गरजेचे आहे. जे आजच्या उद्योजकांसमोर एक मोठे आव्हान आहे.
5. टॅलेंट: भारतात प्रचंड प्रतिभासंचय असताना, योग्य कौशल्ये शोधणे, प्रतिभा टिकवून ठेवणे आणि कौशल्यांमधील अंतर भरून काढणे कठीण असते. आज भारतात प्रतिभावंतांची कमी नाही तरी पण आज मार्केटमध्ये कुशल (स्किल्ड) कामगारांची खूप मोठी कमतरता आहे. ज्यामुळे उद्योजक सर्वकाही स्वतः करण्याच्या प्रयत्नात अडकून पडतो व त्यामुळे प्रगती करू शकत नाही.
वाचकांसाठी असाइनमेंट:
आता, प्रिय वाचकांनो, तुमचे विचार शेअर करण्यासाठी मी तुम्हाला प्रोत्साहित करतो. तुम्ही भारतातील उद्योजक आहात की एक उद्योजक होण्याची इच्छा आहे?
तुम्ही एक उद्योजक म्हणून कोणकोणत्या समस्यांचा सामना केला आहे?
तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या इतरांनी या आव्हानांवर कसा विजय मिळवला?
हे शेअर करा.
कृपया आपले अभिप्राय कंमेंट बॉक्स मध्ये अवश्य शेअर करा.
धन्यवाद!
🚀 #आसामी
🚀 #AASAMEE
🚀 #IndianEntrepreneurship
🚀 #Challenges and Triumphs