Sales वाढतोय… पण पैसा कुठेच टिकत नाही?  

“My Business Is Growing, But My Pocket Is Always Empty!”  

6-Step Profit & Cashflow System for Business Owners

Tue Dec 16, 2025

Join profit first communityREGISTER FOR FREE WEBINAR

Sales वाढतोय, काम वाढतंय, पण महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरत नाही…

6-Step Profit & Cashflow System for Business Owners

हा आवाज आज असंख्य उद्योजकांच्या मनातून येतो. बाहेरून बिझनेस grow होत असल्यासारखा दिसतो, लोक कौतुक करतात, पण आतून मात्र सतत ताण, कर्जाचा वाढता डोंगर आणि आपण नेमकं काय चुकतोय?’ हा प्रश्न अस्वस्थ करतो. खरं सांगायचं तर हा प्रश्न तुमचा एकट्याचा नाही. हा त्या प्रत्येक उद्योजकाचा आहे, जो sales ला success समजतो, पण profit आणि cashflow कडे उशिरा पाहतो.

चला, या वेदनेला थेट हात घालूया. “Sales वाढूनही पैसा का उरत नाही?” याचं उत्तर 6 स्पष्ट स्टेप्स मध्ये समजून घेऊया — practical पद्धतीने.

Step 1: पैसा कुठे गळतोय ते शोधा — Revenue आणि Reality वेगळी करा 

पहिली स्टेप म्हणजे स्वतःशी प्रामाणिक होणं. “Revenue is vanity, profit is sanity, and cash is reality” हे वाक्य इथे अगदी तंतोतंत बसतं. Sales चा आकडा मोठा दिसतो, पण त्यातून खरंच किती पैसा हातात राहतोय, हे बहुतेकांना माहीतच नसतं. Profit Diagnostic Audit केल्यावर अनेकांना धक्का बसतो, कारण 1 कोटी sales असूनही net profit 3–4% पेक्षा कमी असतो. पैसा inventory मध्ये अडकलेला असतो, receivables येत नाहीत, overhead खर्च नकळत वाढलेला असतो. या स्टेपमध्ये तुम्हाला तुमच्या बिझनेसचा “Point A” कळतो — म्हणजे आज आपण कुठे उभे आहोत, आणि पैसा नेमका कुठल्या प्रोसेस मधून बाहेर पडतोय. 

Step 2: पैशाचा flow उलटा करा — Profit First System वापरा 

 दुसरी स्टेप थोडी uncomfortable वाटते, पण game changer आहे. बहुतेक उद्योजक आधी सगळ्यांना पैसे देतात आणि शेवटी स्वतःसाठी काही उरेल अशी आशा ठेवतात. पण Profit First System म्हणतो — आधी profit वेगळा काढा, मग खर्च करा. जेव्हा Income, Profit, Owner’s Pay, Tax आणि OPEX अशी वेगळी अकाउंट्स तयार होतात, आणि ठराविक तारखेला पैसे वाटप होतात, तेव्हा बिझनेसला शिस्त लागते. नफा accident ने नाही, तर प्रोसेस मुळे तयार होतो. हळूहळू हातात cash राहायला लागतो, आणि ‘महिन्याचा शेवट कसा पार पडेल?’ ही भीती कमी होते.

JOIN PROFIT FIRST COMMUNITYREGISTER FREE WEBINAR

Step 3: Pricing आणि Product Profitability नव्यानं उभारी द्या 

तिसऱ्या स्टेपमध्ये अनेकांची डोळे उघडतात. Sales वाढतोय म्हणजे सगळं बरोबर आहे, हा मोठा गैरसमज आहे. अनेक वेळा pricing भावनेवर ठरलेली असते — “ग्राहक निघून जाईल”, “market मध्ये हेच rate आहेत” अशा भीतीवर. पण जेव्हा cost-based, value-based आणि profit-based pricing केलं जातं, तेव्हा चित्र बदलतं. 80/20 analysis केल्यावर लक्षात येतं की काही मोजकेच products किंवा customers खरं profit देतात. या स्टेपमध्ये तुम्ही unprofitable growth ला ‘नाही’ म्हणायला शिकता, आणि प्रत्येक sale तुमच्या खात्यात स्पष्ट पैसा आणायला लागते. 

Step 4: खर्चावर लगाम घाला — OPEX वर नियंत्रण ठेवा 

चौथी स्टेप म्हणजे खर्चाची सवय बदलणं. Sales वाढला की खर्च वाढणं हा जणू नियमच झालाय. ऑफिस, staff, सुविधा — सगळं हळूहळू फुगत जातं. पण 3Q Test — “हे आवश्यक आहे का? Efficient आहे का? Profit देणार आहे का?” — हा प्रश्न प्रत्येक खर्चाच्या आधी विचारला गेला, तर चित्र बदलतं. खर्च essential, operational आणि luxury अशा गटात विभागल्यावर लक्षात येतं की बरेच पैसे नकळत वाहून जात होते. जेव्हा OPEX वर शिस्त येते, तेव्हा profit आपोआप श्वास घ्यायला लागतो. 

JOIN PROFIT FIRST COMMUNITYREGISTER FREE WEBINAR

Step 5: Team ला Profit शी जोडा — फक्त Sales नाही 

पाचवी स्टेप culture बदलते. जर team ला फक्त sales साठी reward केलं, तर ते काहीही विकतील. पण जेव्हा KPI मध्ये margin, cost efficiency आणि cash collection येतं, तेव्हा निर्णय बदलतात. Sales team विचार करून deal करते, operations waste कमी करतात, accounts वेळेत पैसा आणतात. हळूहळू team ‘पगार घेणारी’ नसून ‘भागीदारासारखी’ वागायला लागते. Profit ही फक्त मालकाची जबाबदारी राहत नाही, ती सगळ्यांची होते. 

Step 6: Monthly Profit Rituals आणि Dashboard तयार करा 

शेवटची स्टेप म्हणजे profit ला नियमित पाहणं. अनेक बिझनेसमध्ये profit वर्षातून एकदाच पाहिला जातो — audit च्या वेळी. पण profit रोज, आठवड्याला, महिन्याला पाहिला गेला पाहिजे. साधा dashboard, weekly pulse, monthly review आणि quarterly celebration — या प्रोसेस मुळे profit जिवंत राहतो. पैसा दिसायला लागला की भीती कमी होते, आणि wealth निर्माण करण्याची सवय लागते. 

Sales वाढूनही पैसा न उरणं ही अपयशाची खूण नाही, तर चुकीच्या प्रोसेस ची खूण आहे. जेव्हा बिझनेस profit-first विचार करायला लागतो, खर्चावर शिस्त येते आणि team profit समजून काम करते, तेव्हा चिंता कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. कारण शेवटी बिझनेसचा उद्देश फक्त चालणं नाही, तर तुमचं आयुष्य सुसह्य आणि सुरक्षित करणं हा असतो.

JOIN PROFIT FIRST COMMUNITYREGISTER FREE WEBINAR

Mahesh Sawarikar
Profit Accelerator Coach.