There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
६१% उद्योजकाची कर्जे मागील ३-५ वर्षात वाढली आहेत.
६४% उद्योजकांना त्यांचा प्रॉफिट नक्की किती झाला हे सांगता येत नाही.
५९% उद्योजक त्याच्या उधारीमुळे त्रस्त आहेत.
८४% उद्योजकांना वर्किंग कॅपिटल साठी लागणाऱ्या पैशाची कमतरता भासते.
तुम्हीपण या गोष्टींशी सहमत असाल आणि तुम्हालाही या व यासारख्या इतर सस्यांमधुन बाहेर पडायचे असेल तर आमच्या १० दिवसांच्या बिझनेस प्लॅन वर्कशॉपला रजिस्टर करा. अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर रजिस्टर करा:
Language: Marathi
Instructors: Mr. Mahesh Sawarikar
Why this course?
आर्थिक साक्षरता मीशन हि एक चळवळ आहे, समाजातील लोकांच्या आर्थिक अडचणीना दूर करण्यासाठी त्यांना आर्थिक साक्षर करणे हाच एक उत्तम पर्याय आहे. समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी उद्योजक निर्मिती झाली पाहिजे व ती टिकली पाहिजे, परंतु आज बरेचसे उद्योजक उत्साहात नवीन व्यवसायाची सुरूवात करतात पण आर्थिक साक्षर नसल्याने पहिल्या १ -२ वर्षातच ते बंद करतात. यामुळे त्याचे नुकसान तर होतेच पण समाजाचे, देशाचे नुकसान सुद्धा होत आहे. आणि उद्योग व उद्योजक हा एकच घटक आहे जो या समाजाला श्रीमंत व समृद्ध बनवू शकतो म्हणूनच उध्योजकांना आथिर्क साक्षर करून समाज श्रीमंत व सम्रुद्ध बनविणे हे आमच्या असण्याचं कारण आहे.
आसामी म्हणजेच आर्थिक साक्षरता मिशन या संस्थेच्या अंतर्गत आम्ही समाजात आर्थिक साक्षरतेचा प्रसार करून लोकांना श्रीमंत व समृद्ध करणे या ध्येयाने काम करत आहोत व हेच आमचे मिशन आहे. हे करत असताना आम्ही उद्योजकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देतो तसेच वेगवेगळ्या प्रकारचे सेमिनार्स घेतो.
आज उद्योजक व्यवसाय करत असताना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करत आहेत जसे दैनंदिन वापरासाठी लागणारे खेळते भांडवल, उधार वसुली, स्पर्धा, योग्य नफा या सारख्या अनेक. या समस्यांचा सामना करताना उद्योजकांची बरीचशी शक्ती खर्च होत असते त्यामुळे व्यवसाय वाढीसाठी जोमाने काम करणे होत नाही. खरे तर या सगळ्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी धडपडण्यातच वेळ खर्च होतो व हे करत असताना घाई घाईने निर्णय घेतले जातात आणि या निर्णयाचे परिणाम कधी कधी मोठी अडचण निर्माण करून नुकसान करतात. खरेतर व्यवसाय म्हणजेच निर्णय घेण्याच्या क्षमतेतून नफा कमावणे, शेवटी जोखीम (रिस्क) घेण्याचा निर्णयच नफा कमावून देतो. त्यामुळेच आम्ही उद्योजकांचा नफा वाढविणे व त्याला त्याच्या निर्णयातून जास्तीत जास्त नफा / फायदा करून देऊन त्याला श्रीमंत करणे हा आमचा हेतू आहे .
या सेमिनार मध्ये आम्ही प्रत्येक व्यवसायाचा वार्षिक आराखडा कसा तयार करायचा यावर महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करतो ज्यामध्ये येत्या वर्षात किती ध्येय ठेवले आहे व ते कसे साध्य करायचे, त्यासाठी नक्की काय करावे लागणार आहे याचा लेखी अहवाल तयार केला जातो. बिझनेस प्लॅन सेमिनारमध्ये पुढील विषयावर घेतले जाईल
1.व्यवसायाचे व्हिजन व मिशनकसेअसावे.
2.तुमच्या व्यवसायबद्दलची तुमची स्पष्टता शोधली जाईल व तुम्हाला तुमच्या व्यवसाय बद्दल शंकाअसल्यास त्यावर काम केले जाईल. यामुळे तुम्हाला तुम्ही नक्की कोणता व्यवसाय करावा हे स्पष्ट होईल.
3.तुमचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी तुम्हाला नक्की कोणत्या ग्राहकावर फोकस करावा लागेल हे यात तुम्हाला लक्षात येईल
4.व्यवसाय करताना पैशाचे व्यवस्थापन नक्की कसे करावे, कुठेपैसा खर्चकरावा, कोण कोणत्या मार्गाने उत्पन्न येईल, यासारख्या पैशासंबंधीअनेक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या कार्यशाळेत मिळेल.
5.व्यवसाय कसा वाढवावा, व्यवसाय वाढीसाठी कश्या पद्धतीने नियोजन करावे, ते करत असताना कोणकोणत्या बाबींचा विचारकरावा.
6.व्यवसाय करताना कोणती लोंक घ्यावी?
7.व्यवसाय करताना कोणते डावपेच (स्ट्रॅटेजि - Strategy ) वापरावे.
8.उधारवसुली नियमितपणे कशीकरावी.
9.गुंतवणूकदारांसाठी (इन्वेस्टरसाठी) बिझनेस प्लॅन कसाबनवावा?
10.तुमच्या व्यवसायाचा ब्रँड कसा बनवावा ?
11.तुम्ही तुमच्या व्यवसायाचे मार्केटअनालिसिस (विश्लेषण ) कसेकरावे?
After successful purchase, this item would be added to your courses.You can access your courses in the following ways :